रत्नागिरी जिल्हा परिषद; ५६ गटांचे आरक्षण ठरले
- by Yogesh Bandagale
- October 13, 2025
- 568 views
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण मंत्रालयात जाहीर झाल्यानंतर सोमवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील 56 गटांचे आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे.
या आरक्षणानंतर आता स्पष्ट होणार आहे की कोणत्या गटाचे प्रतिनिधी सभागृहात बसणार आहेत आणि कोणाचा पत्ता कट होणार आहे. यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेतील पद्धत आणि उमेदवार निवडीच्या शक्यता अधिक स्पष्ट होतील.
जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना योग्य वेळेत माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणातील पुढील हालचालींचा मार्गदर्शन करता येईल.
