सामाजिक बांधिलकीतून खेर्डी चिंचघरी सती विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यामार्फत वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे चिपळूणचे समन्वयक अनंत डिगणकर,सदस्य श्री.प्रदीप खेडेकर तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार संतोष कुळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले.जेष्ठ शिक्षक संतोष हातणकर यांनी प्रास्ताविकामधून विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व स्तरातील समाज घटकांसाठी 2008 पासून शिक्षण,रोजगार,आरोग्य,स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहे.कोकणातील तळागाळातील समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच तसेच त्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात.यातीलच उपक्रमाअंतर्गत  विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतच्या सुमारे 2010 विद्यार्थ्यांना एकूण 5500 वह्यांचे वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी संस्थेचे आभार मानत सांगितले की,“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होते व त्यांचा आत्मविश्वास वाढतो.”उपमुख्याध्यापिका सौ.सुलोचना जगताप यांनी उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाला इयत्ता 5 वी ते 12 वी चे सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष हातणकर व आभार श्री.सतीश पालकर यांनी मानले.

संबंधित लेख