चिपळूण पालिकेतील उबाठाच्या नगरसेवकांचा सत्कार

चिपळूण, दि. २४ डिसेंबर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्रजी डोळस यांनी चिपळूण येथील पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी श्री. मिथिलेश उर्फ विकी नरळकर, सौ. कांचन शिंदे, श्री. संजय गोताड, सौ. वैशाली कदम आणि श्री. अजय भालेकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री. डोळस यांनी नगरपरिषदेमधील पक्षाच्या आगामी भूमिकेबाबत मार्गदर्शन करत चिपळूणच्या विकासात्मक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचे आणि नागरिकांच्या हितासाठी एकसंघपणे काम करण्याचे संदेश दिले.

याच भेटीत निवडणुकीत यश न मिळालेल्या सर्व उमेदवारांचीही भेट घेतली गेली. निवडणूक काळातील अडचणी, अनुभव व राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करत, त्यांनी सर्वांना खचून न जाता नव्या उमेदीने जनसंपर्क वाढवण्याचे आणि पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम, युवा सेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख श्री. सचिन शेट्ये, श्री. राजाभाऊ नारकर, विभागप्रमुख श्री. अजित गुजर, उपविभागप्रमुख श्री. विनायक वास्कर, श्री. राजू सुर्वे तसेच तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री. सचिन चोरगे उपस्थित होते.

श्री. डोळस यांच्या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चिपळूणमधील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त झाला असून, पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने विकास व जनहिताच्या कामात सहभाग घेण्याचे संकल्प व्यक्त केले.

संबंधित लेख