डॉ. शुभम कुशे यांच्या ‘कुशे मल्टिकेअर क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर’चे उदघाटन

राजापूर: आयुर्वेदिक उपचारांच्या पारंपरिक वारशाला आधुनिक उपचारपद्धतीचा संगम देत डॉ. शुभम कुशे यांच्या कुशे मल्टिकेअर क्लिनिक अँड पंचकर्म सेंटरचे उदघाटन नुकतेच झाले. या उपक्रमाचे उद्घाटन राजेंद्र कुशे व रसिका कुशे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजापुरातील कुशे कुटुंबाची आयुर्वेदिक परंपरा गोविंद दत्तात्रय कुशे यांनी १९२६ मध्ये सुरू केली होती. नंतर (श्रीराम) बाबा कुशे यांनी परिसरातील गावोगाव फिरून आयुर्वेदाचा प्रचार केला. या परंपरेला आज डॉ. शुभम कुशे ‘परंपरेचं ज्ञान, आधुनिकतेचं बळ’ या तत्त्वावर पुढे नेत आहेत.

डॉ. शुभम कुशे यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसीन अँड सर्जरी पदवी घेतली असून, पंचकर्मसाठी धुळे येथील डॉ. प्रवीण जोशी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा सुवर्णप्राशन संस्कार विशेष लोकप्रिय असून, आतापर्यंत त्यांनी २ हजारांहून अधिक बालकांना सुवर्णप्राशन संस्कार दिले आहेत. तसेच त्यांनी तयार केलेला च्यवनप्राश सुद्धा प्रसिद्ध आहे.

क्लिनिकमध्ये केवळ उपचारच नव्हे तर मार्गदर्शन सेवाही उपलब्ध असणार आहे. गंभीर आजार असणाऱ्यांसाठी योग्य उपचार, हॉस्पिटल निवड, सरकारी योजना आणि मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक मार्गदर्शन यावर रुग्णांना सल्ला दिला जाईल.

कुशे मल्टिकेअर क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर मध्ये

  • हृदयाचे आजार, किडनी व लिव्हरचे आजार

  • मूळव्याध, डायबिटीस, बीपी

  • संधीवात, आमवात, गुडघे व कंबर दुखी

  • पंचकर्म, अग्निकर्म, विद्धकर्म
    सह आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यात राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, डॉ. बालकृष्ण पाध्ये, डॉ. जोशी (जोशी हॉस्पिटल), डॉ. सुयोग परांजपे (संजीवनी हॉस्पिटल), भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा ताई मराठे, राजापूर अर्बन बँक चेअरमन संजय ओघले, वाइस चेअरमन विजय पाध्ये, पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र मोहिते, महिला पतपेढी चेअरमन श्रुती ताम्हणकर, सचिव प्रेरणा अमरे तसेच संचालक मंडळी उपस्थित होते.

डॉ. शुभम कुशे म्हणाले की, “राजापुरातील नागरिकांना आरोग्यासाठी बाहेरगावी जाऊन त्रास होऊ नये, यासाठी क्लिनिक सतत सज्ज असेल. येणाऱ्या पिढीसाठी आरोग्य व शैक्षणिक मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी आम्ही येथे देणार आहोत.”

संबंधित लेख