सर्वोत्तम विद्यार्थी ‘गोडबोले पुरस्कार’ ईशान मोरेश्वर वझे याला प्रदान
- by Yogesh Bandagale
- January 12, 2026
- 141 views
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी. ए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय, अलोरे येथील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या कु. ईशान मोरेश्वर वझे याला सन 2025–26 साठीचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, सर्वांगीण प्रगती व सहअभ्यासक्रमातील सहभाग या निकषांवर आधारित या पुरस्कारासाठी ईशानची निवड करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सोळूंके सर, पर्यवेक्षिका श्रीमती गमरे मॅडम, शिक्षक प्रतिनिधी सौ. मानकर मॅडम, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. चिपळूणकर सर तसेच संपूर्ण अध्यापक वृंद यांनी प्रशालेच्या वतीने ईशानचे हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी ईशानच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्ज्वल यश व निरंतर प्रगतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
