चिपळूण अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. ओंकार खोत पूर्णवेळ रुजू
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 35 views
चिपळूण : चिपळूणातील सुप्रसिद्ध Aparant Multispeciality Hospital येथे मिरज व सोलापूर प्रशिक्षित फिजिशियन डॉ. ओंकार खोत पूर्णवेळ रुजू झाले असून मेडिसिन विभागाच्या बळकटीकरणात मोलाची भर पडली आहे. कुशल वैद्यकीय तज्ञ आणि अत्याधुनिक सुविधा यांचा समसमा संयोग आता चिपळूणमध्येच उपलब्ध होणार आहे. डॉ. खोत यांनी Government Medical College, Miraj येथून पदवी शिक्षण पूर्ण केले असून सोलापूर येथून एम.डी. (मेडिसिन) पदव्युत्तर शिक्षण संपादन केले आहे. शिक्षणकाळात त्यांनी सातत्याने विशेष गुणवत्ता राखली आहे. त्यांनी व्हेंटिलेटर मॅनेजमेंट, आयसीयू केअर तसेच तातडीच्या जीवनरक्षक उपचारांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून त्यात उल्लेखनीय प्राविण्य मिळवले आहे. अपरांत हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर, 2D इको, कार्डियाक मार्कर्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, श्वसनविकार तसेच इतर गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचार अधिक प्रभावी व रुग्णाभिमुख पद्धतीने दिले जाणार आहेत. मोठ्या शहरांप्रमाणे दर्जेदार आरोग्यसेवा चिपळूणमध्ये उपलब्ध व्हावी या उद्देशाने रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा सक्षम चमू कार्यरत आहे. डॉ. ओंकार खोत यांच्या पूर्णवेळ नियुक्तीमुळे मेडिसिन विभाग अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दैनंदिन ओपीडी सेवा उपलब्ध असून आपत्कालीन सेवा २४x७ सुरू आहे. संपर्कासाठी मोबाईल ७९९८८९८९८९ / ७९९८७३७३७३ तसेच दूरध्वनी (०२३५५) २५४२५४ / २५४३४५ येथे संपर्क साधावा. पत्ता – सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे, चिपळूण. “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!”
