चिपळूण साउंड असोसिएशनतर्फे पोलिस ठाण्याला स्पीकर बॉक्स भेट
- by Yogesh Bandagale
- September 25, 2025
- 113 views
चिपळूण : चिपळूण साउंड असोसिएशनच्या वतीने चिपळूण पोलिस ठाण्यास स्पीकर बॉक्स भेट देण्यात आली. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ही भेट स्वीकारली.
या वेळी त्यांचे सहकारी संकेत गुरव आणि रमेश चव्हाण उपस्थित होते. तसेच साउंड असोसिएशनचे सभासद भूषण कांबळी, रोहित कदम, रवी वाघे, स्वप्नील खेराडे, संकेत कदम, जयेश बोबले, सुहास अदावडे, शैलेश जाधव, सूरज दळवी, शुभम चव्हाण, प्रमोद माटे, अभिषेक तांबे, विराज साळुंखे, पंकज तांबडे, विराज खेरडकर यांच्यासह अनेक व्यावसायिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पोलीस-व्यावसायिक यांच्यातील आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
