चिपळूण नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड २० जानेवारीला
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 129 views
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुका मंगळवार, दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहेत.
या दिवशी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षांना पदसिद्ध कोणत्या समितीचे सदस्यत्व देण्यात येणार, याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय समितीच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
नगरपरिषदेत शिवसेना-भाजप महायुतीकडे वर्चस्व व स्पष्ट बहुमत असल्याने या सर्व विषय समित्यांचे नेतृत्व महायुतीकडेच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
