श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयाला जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

चिपळूण, ता. २: चिपळूण नगर परिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वक्तृत्व स्पर्धेत कु. वेदिका विष्णू हरवडे हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धेत कु. वैष्णवी गजानन हळदे हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

बक्षीस वितरण समारंभ आज म. गांधी जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता गांधारेश्वर मंदिराजवळील महात्मा गांधी रक्षाकलश समोर मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन प्रा. रुपेश भालेकर यांनी केले.

स्पर्धा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण येथे संपन्न झाली होती. स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल महाविद्यालयास पुस्तक भेटवस्तूही प्रदान करण्यात आली.

या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन श्री. मल्लेश लकेश्री, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, रजिस्ट्रार अजित खेडेकर, पी.आर.ओ. योगेश चोगले, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ कांबळे, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख