युती झाली तर ठीक, नाही झाली तरी स्वबळावर सज्ज!; आ. शेखर निकम यांचा इशारा
- September 20, 2025
- 80 Views
चिपळूण : गोवळकोटचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक गोविंदगडावर झालेल्या रणसंग्रामाला यंदा ५ ऑक्टोबर रोजी २९२ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ ‘गोविंदगड लढाई स्मरण दिन’ व ‘गोविंदगड रन मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्वातंत्रवीर सावरकर सभागृह, चिपळूण येथे स्मरण दिन कार्यक्रम होणार आहे. या वेळी व्याख्यानासाठी शिव शंभू व्याख्याते बालाजी काशिद (पुणे) उपस्थित राहणार असून आमदार शेखरजी निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, पिलाजीराव गोळे यांचे वंशज मारुती आबा गोळे, इतिहास अभ्यासक संदीप परांजपे, माजी नगराध्यक्ष बापू काणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच औचित्याने गोविंदगड रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सातारा हिल मॅरेथॉन सुवर्णपदक विजेते डॉ. समुद्र पाटील व आग्रावीर मारुती (आबा) गोळे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा दोन गटांत होणार असून वय १५ वर्षांखालील गटासाठी ५ किमी तर वय १६ वर्षांवरील गटासाठी ७ किमी अंतर ठेवण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी ७ ते ९.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (वेस मारुती मंदिर) येथून सुरू होऊन तेथेच संपणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी या स्पर्धेस सहकार्य करावे, असे आवाहन सरनोबत पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान व राजे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्कासाठी : प्रथमेश शिंदे – ९१४५११९८१७ आशिष कानापडे – ७८७५३७१९१५ यांच्याशी संपर्क साधावा.
