हर्षल पवारचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 117 views
चिपळूण : जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कापरे देऊळवाडा, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील विद्यार्थी हर्षल संदिप पवार याने जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उंचउडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा श्री. वालावकर ट्रस्ट, डेरवण येथे संपन्न झाली.
हर्षलच्या या यशामुळे शाळेचा, गावाचा तसेच तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. अभ्यासासोबतच क्रीडा व विविध कलांमध्ये प्राविण्य मिळवणारा हर्षल हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच वडील संदिप पवार व आई संजना पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूण तालुका गटशिक्षणाधिकारी मान. दादासाहेब इरनाक, केंद्रप्रमुख संतोष होमकर, श्री नागार्जुन देवस्थान ट्रस्ट, गावाचे सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशिष मोरे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक नेते बळीराम मोरे, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका मानसी महाडीक, ज्येष्ठ आदर्श शिक्षक प्रकाश गांधी, पदवीधर शिक्षक संतोष तांबे, उपशिक्षक गणेश सुर्वे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती, सखी सावित्री समिती, सर्व पालक, ग्रामस्थ व हितचिंतक मित्रमंडळ यांच्या वतीने हर्षल पवार याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
