खेर्डी येथे दशरथ दाभोळकर यांचा आज सुवर्णमहोत्सवी वाढदिवस
- by Yogesh Bandagale
- May 02, 2026
- 113 views
खेर्डी : येथील माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. दशरथ दाभोळकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सुवर्णमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
खेर्डी एम.आय.डी.सी. परिसरातील अमेय स्पोर्ट्स क्लब येथे, सूर्यनगरी हनुमान मंदिराजवळ हा सोहळा होणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दाभोळकर यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक, क्रीडा व ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले गेले असून, जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांना परिसरात ‘आधारस्तंभ’ व ‘प्रेरणास्थान’ म्हणून ओळखले जाते.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन विठलवाडी गणेश मित्र मंडळ खेर्डी व गुड मॉर्निंग ग्रुप खेर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
