चिपळूण पंचायत समिती गणनिहाय आरक्षणाचा तपशील जाहीर
- by Yogesh Bandagale
- October 13, 2025
- 839 views
चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर आज सोमवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी गणनिहाय आरक्षणाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे .आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता संभाव्य उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेक वरिष्ठ सदस्य आणि माजी पदाधिकारी आता सक्रिय झाले आहेत या आरक्षणानुसार विविध गणांसाठी प्रवर्ग निश्चित करण्यात आले आहेत.
