विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रीक्वेंसी ओम्नी डायरेक्शन रेडिओ रेंजसाठी भूसंपादन मोबदला धनादेश वितरण
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 141 views
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) दरम्यान राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा – शासन आपल्या दारी या उपक्रमातून भारतीय तटरक्षक अवस्थानासाठी विमानतळावर डॉप्लर व्हेरी फ्रीक्वेंसी ओम्नी डायरेक्शन रेडिओ रेंज (डीव्हीओआर) स्थापनेसाठी भूसंपादन करण्यात आले. या भूसंपादनाचा मोबदला म्हणून खातेदार चेतन जगदीश चौहान, राजकुमार चौहान व माया चौहान यांना १ कोटी ७७ लाख ४ हजार ७९५ रुपयांचा धनादेश आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
