सुरेशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा उपक्रम; शिवसेनेचा माणुसकीचा आदर्श

चिपळूण : संगमेश्वर-चिपळूण विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख आदरणीय श्री. सुरेशराव आत्माराम कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला रुग्णसेवा उपक्रम समाजभिमुखतेचा आदर्श ठरला आहे. उपजिल्हा रुग्णालय, कामथे – चिपळूण येथे रुग्णांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देणे आणि फळवाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. हा उपक्रम औपचारिकतेपलीकडे जाऊन मानवी मूल्यांना स्पर्श करणारा असल्याचे मत रुग्ण व रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले.

या कार्यक्रमात चिपळूण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत बांधिलकीचे दर्शन घडवले. कार्यक्रमात क्षेत्र प्रमुख श्री. महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख श्री. बळीराम गुजर, तालुका समन्वयक श्री. सुधीर भाऊ शिंदे, शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम, महिला उपजिल्हा संघटिका सौ. ऐश्वर्याताई घोसाळकर, शिव आरोग्य जिल्हा संघटिका सौ. सुचित्राताई खरे, महिला क्षेत्र संघटिका सौ. रुमाताई देवळेकर, युवा सेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख श्री. राजाभाऊ नारकर, श्री. सचिन शेट्ये, विभाग प्रमुख श्री. अजित गुजर, श्री. सागर सावंत, तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. सचिन चोरगे, उपविभाग प्रमुख श्री. अनंत खैर, श्री. दिनकर जाधव, श्री. समीर सावंत, विभाग संघटक श्री. उमेश चिपळूणकर, युवा सेना विभाग अधिकारी विशाल परकर, श्री. प्रसाद खेतले, शाखाप्रमुख श्री. रोशन जंगम, श्री. अनिल चव्हाण तसेच ज्येष्ठ शिवसैनिक महादेव बुवा खेतले, श्री. रवींद्र खेतले आदी मान्यवर उपस्थित होते.

रुग्णालयातील अनेक रुग्णांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला. व्हीलचेअर सारख्या सुविधा वाढवून रुग्णालय व्यवस्थेलाही सकारात्मक मदत मिळाली. केवळ टीकेच्या पलीकडे जाऊन स्पर्धा सेवाकार्यात असावी, याचे प्रत्यक्ष उदाहरण या उपक्रमाने उभे केले.

संबंधित लेख