सहकार सप्ताहानिमित्त शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

दाभोळ (दापोली) : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ शाखेतर्फे सहकार सप्ताहानिमित्त शैक्षणिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद ओणी-भाटी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘चिल्ड्रन्स मनी बँक आणि बचतीचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

या सत्रादरम्यान पतसंस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना भविष्यातील बचतीचे फायदे, आर्थिक शिस्तीचे महत्त्व, तसेच बँक व्यवहार कसे करावेत याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली. बचत ही लहानपणापासून घडवायची सवय आहे आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी ती अत्यावश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

उपक्रमाला शाखा पालक सौ. दीप्ती कोळथरकर, शाखाधिकारी सौ. सायली भोसले, भाटी ग्रामस्थ, तसेच शाळेतील शिक्षक श्री. अशोक पवार आणि श्री. राजेश गावित यांची उपस्थिती लाभली. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले.

दाभोळ शाखेतर्फे आयोजित हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, सहकार सप्ताहाच्या निमित्ताने समाजात आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यास महत्त्वाची मदत झाली.

संबंधित लेख