रामपूर विभागात शिवसेनेची निवडणूकपूर्व बैठक; एकजुटीने काम करण्याचा निर्धार

चिपळूण : आज दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी रामपूर विभागातील शिवसेना पक्षाची निवडणूकपूर्व प्राथमिक चर्चा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी ही छोटी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विक्रांत चव्हाण, योगेश खांडेकर व रुपेश खांडेकर यांच्यापैकी पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील, त्या उमेदवाराला एकजुटीने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकमताने काम करण्याचा निर्णय घेतला.

तसेच पंचायत समितीच्या उमरोली गणासाठी जितेंद्र चव्हाण आणि गुढे पंचायत समिती गणासाठी मानसी मंगेश नावले (मोरे) यांच्या उमेदवारीसाठीही एकदिलाने आणि संघटितपणे काम करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

याशिवाय शिवसेना–भाजप युती संदर्भात पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील, ते मान्य करून युतीच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकमताने व निष्ठेने काम करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, आगामी निवडणुकांसाठी रामपूर विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि एकजूट दिसून येत आहे.

 

संबंधित लेख