पहिल्या दिवशी २८४ अर्ज नेले, एकही दाखल नाही

रत्नागिरी (जिमाका) : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी एकूण २८४ नामनिर्देशन अर्ज नेले; मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही.

जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार निवडणुकीची सूचना राजपत्र, स्थानिक वृत्तपत्रे, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालये, गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

पंचायत समितीनिहाय स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली असून, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत १६ ते २१ जानेवारी अशी निश्चित करण्यात आली आहे.

संबंधित लेख