मेहुल कुलकर्णी, श्लोक शिंदे व मुग्धा गोताड यांची बाजी
- by Yogesh Bandagale
- January 12, 2026
- 42 views
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेत मेहुल मंगेश कुलकर्णी याने प्रथम क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धेत श्लोक सूरज शिंदे आणि मुग्धा रोहित गोताड यांनी अव्वल कामगिरी केली.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, सावर्डे यांच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धा कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे यांच्या सभागृहात नुकत्याच पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन सह्याद्री कॉम्पिटेटीव्ह अकॅडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती पूजा निकम, प्राचार्य तानाजी कांबळे, प्राचार्य राजेंद्र वारे, सावर्डेचे माजी सरपंच शौकत माखजनकर, मीरा जोशी, शकील मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा निकाल
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी “घरात हवेत आजी–आजोबा” आणि “सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम” हे विषय देण्यात आले होते.
-
प्रथम : मेहुल मंगेश कुलकर्णी (सह्याद्री प्राथमिक शाळा, सावर्डे) – ₹5,000, चषक व प्रमाणपत्र
-
द्वितीय : दुर्वांक अविनाश शिंदे (प्राथमिक शाळा खेर्डी–चिंचघरी–सती) – ₹3,000, चषक व प्रमाणपत्र
-
तृतीय : साईशा कमलेश वांद्रे (आर. सी. काळे प्राथमिक विद्यालय, पेढे–परशुराम) – ₹2,000, चषक व प्रमाणपत्र
-
उत्तेजनार्थ : प्रभास प्रमोद कदम (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड) व मैत्रेय अंकुर आजगावकर (ज्ञानेश्वर विद्यामंदिर, लांजा)
निबंध स्पर्धा निकाल
निबंध स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाबद्दल श्लोक सूरज शिंदे यांना आमदार शेखर निकम यांच्याकडून विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले असून त्याचे स्वरूप ₹5,000, चषक व गौरवपत्र असे आहे.
-
प्रथम : मुग्धा रोहित गोताड (जि. प. प्राथमिक शाळा, कासे नं. 2) – ₹5,000, चषक व प्रमाणपत्र
-
द्वितीय : ईशान अभय गोखले (जि. प. शाळा, नारदखेरकी नं. 2) – ₹3,000, चषक व प्रमाणपत्र
-
तृतीय : स्वरा मंगेश शिगवण (जि. प. शाळा, आंबव पोंक्षे) – ₹2,000, चषक व प्रमाणपत्र
-
उत्तेजनार्थ : प्रांजल प्रकाश बुदर (जि. प. शाळा, कोकरे नं. 1) – ₹750, चषक व प्रमाणपत्र
परीक्षक व संयोजन
या स्पर्धांसाठी भानुदास देसाई (वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालय, असुर्डे) व शिल्पा राजेशिर्के (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शकील मोडक, सेजल साळवी, रसिका सुर्वे, अनिल रेडेकर, सतीश वारे, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, नीलम हुमणे, मनीषा शिंदे, शीतल सुर्वे, सायली शिर्के, स्मिता सावंत, संतोष शिर्के, समीक्षा पवार, प्रणित राजेशिर्के, पूनम भुवड, रूपाली बागवे, जान्हवी पवार, संजना चव्हाण, गायत्री वनकुते, योगिता मोहिते, पूनम चांदेकर, रूपाली कुंभार, एकता जगदाळे, वैष्णवी बुदर, अंकिता गिरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकस्थळी आयोजित करण्यात आला आहे.
