नवनिर्वाचित नगरसेवक अजय भालेकर यांचा खेंड येथे सत्कार
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 244 views
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ खेंड–उक्ताड विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. अजय पांडुरंग भालेकर, त्यांची पत्नी सौ. शर्मिला अजय भालेकर व मुलगी कु. आर्ची अजय भालेकर यांचा खेंड पाच माडकर येथील श्री देव विठ्ठल मंदिर मित्र मंडळ, चिपळूण यांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
हा सत्कार मंडळाचे सचिव सुहास चव्हणं, सचिन साडविलकर, सुचेद्र गांधी, सुनील खरात, दत्तात्र्य जंगम, अंकित खेडेकर, सचिन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खेंड विभागातील ग्रामस्थ, भक्तगण व नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
