दापोली-खेडमध्ये ‘सिरीयल किलर’ नाटकाचे खास प्रयोग

दापोली/खेड : घराघरातून पाहिल्या जाणाऱ्या टीव्ही मालिका आणि त्यातील पात्रांच्या प्रभावामुळे वास्तव जगापासून मन दुरावण्याचा विषय विनोदी अंदाजात मांडणारे ‘सिरीयल किलर’ हे नाटक आता दापोली व खेडच्या रंगभूमीवर रंगणार आहे.
०१ नोव्हेंबर, शनिवार, रात्री ९.३० – रसिकरंजन नाट्यमंदिर, दापोली
०२ नोव्हेंबर, रविवार, रात्री ९.३० – स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड

या नाटकात महाराष्ट्राच्या विनोदविश्वातील लोकप्रिय कलाकार भाऊ कदम हे वेगळ्या रूपात ‘किलर’ची भूमिका साकारत असून त्यांच्या अभिनयातील निरागसता, विनोद आणि भावनिक छटा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. सोबतच मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार, तसेच जयंती-गौरी किरण व नवीन चेहरा तेजस पिंगुळकर रंगमंचावर प्रभावी केमिस्ट्री निर्माण करत आहेत.

लेखक-दिग्दर्शक केदार देसाई यांनी मालिकांच्या आभासी प्रभावाचा धागा पकडून त्याला रोचक नाट्यकथेत गुंफले आहे. नावात ‘किलर’ असले तरी नाटक भीतीदायक नसून हसवतानाच अंतर्मुख करणारे असे क्लासिक कॉमेडी स्वरूप आहे.

नाटकाच्या यशात प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), श्याम चव्हाण (प्रकाश), ईशान देसाई (वेशभूषा), उल्लेश खंदारे (रंगभूषा)विजय गवंडे (संगीत) यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निर्मिती सिंधुसंकल्प एन्टरटेन्मेंटची, प्रस्तुती अष्टविनायकची असून निर्माता प्रणय तेली आहेत.

सस्पेन्स, ड्रामा, थ्रील आणि धारदार विनोदाने सजलेली दोन तासांची धमाल रोलर कोस्टर राईड दापोली व खेडमधील नाट्यप्रेमींना नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरेल.

संबंधित लेख