नॅशनल लेव्हल ॲबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे / रत्नागिरी : २५ डिसेंबर २०२५ रोजी कर्वेनगर, पुणे येथे झालेल्या नॅशनल लेव्हल ॲबॅकस स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. कमी वेळेत अधिकाधिक गणिते अचूक सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा व एकाग्रतेचा प्रभावी प्रत्यय दिला.

यशस्वी विद्यार्थ्यांची कामगिरी

ज्युनियर लेव्हल (९ वर्षांखालील)
तेजस तुषार गगनग्रास (इयत्ता दुसरी, एस.पी.एम. परशुराम शाळा) याने ९ मिनिटांत १४७ गणिते अचूक सोडवत द्वितीय क्रमांक पटकावला.
विराज विनय पवार (इयत्ता दुसरी, महिंद्रा ॲकॅडमी, मालाड पूर्व, मुंबई) याने ९ मिनिटांत १३९ गणिते अचूक सोडवत तृतीय क्रमांक मिळवला.

लेव्हल A
रुद्र कृष्णा ढेरे (इयत्ता पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज, खेर्डी–चिंचघरी सती) याने ८ मिनिटांत १४८ गणिते अचूक सोडवत प्रथम क्रमांक मिळवला.
तिर्था सुदर्शन देसाई (इयत्ता चौथी, इंग्लिश मिडियम स्कूल, सावर्डे) हिने ८ मिनिटांत १४७ गणिते अचूक सोडवत तृतीय क्रमांक मिळवला.
राघव श्रीमंतराय जमादार (इयत्ता चौथी, मेरी माता शाळा) याने ८ मिनिटांत १४५ गणिते अचूक सोडवत पाचवा क्रमांक पटकावला.

लेव्हल B
मोक्ष प्रविण चव्हाण (इयत्ता चौथी, मेरी माता शाळा) याने ८ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवत द्वितीय क्रमांक मिळवला.

लेव्हल D
वरदराज संतोष पांढरे (इयत्ता पाचवी, सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम शाळा) याने ८ मिनिटांत ११६ गणिते अचूक सोडवत प्रथम क्रमांक मिळवला.
विनोद अशोक राठोड (इयत्ता पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज, खेर्डी–चिंचघरी सती) याने ८ मिनिटांत १०४ गणिते अचूक सोडवत चौथा क्रमांक मिळवला.
आर्यन संतोष कलकुटकी (इयत्ता आठवी, न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज, खेर्डी–चिंचघरी सती) याने ८ मिनिटांत १०३ गणिते अचूक सोडवत पाचवा क्रमांक पटकावला.

स्पर्धेत सहभागी झालेले इतर विद्यार्थी

सौम्या अमित जोशी, आर्य रुपेश काजवे, गिरीश अरविंद मोरे, पृथा प्रिन्स सावंत, आरोही निलेश ठाकरे, मैथिली वैभव राणे, सफवान इरशद खलपे, रुद्र राहुल गुजले, रुद्र प्रफुल्ल कानडे, मल्हार उमेश पवार, भार्गवी रंजीत आवले यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रयत्न केले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, पालकांचे पाठबळ तसेच मार्गदर्शकांचे योग्य मार्गदर्शन कारणीभूत ठरले. सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा एक अविस्मरणीय अनुभव ठरली. पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य आणि यशाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

संबंधित लेख