खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- March 31, 2026
- 335 views
चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, खेर्डी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
श्री. अनिल शेठ दाभोळकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खेर्डी परिसरात या क्रीडा सोहळ्याबद्दल विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी श्री. अनिल शेठ दाभोळकर, श्री. जयेंद्रथ शेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, श्री. नितीनजी (अबूशेठ) ठसाळे, श्री. प्रकाश शेठ साळवी, श्री. विश्वनाथजी (बाबुशेठ) साळवी, श्री. जमालुद्दीनजी बंदरकर, सौ. निनाताई दाभोळकर, श्री. राकेशजी दाभोळकर, श्री. सचिनजी भोसले यांच्यासह दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेर्डीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्पर्धा सोमवार दि. 30 मार्च 2026 ते बुधवार दि. 1 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळाडूंनीही चुरशीच्या लढती सादर करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी मा. श्री. अनिल शेठ दाभोळकर यांचा 70 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार असून त्यावेळी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण सोहळाही पार पडणार आहे.
खेर्डी व चिपळूण तालुक्यातील सर्व कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
