चिपळूणमध्ये मधुमेह व हृदयविकार रिव्हर्सल वर्कशॉप
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 75 views
चिपळूण : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीसाठी लोकमान्य टिळक वाचनालय, वुमन सपोर्ट वुमन आणि माधवबाग चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने “मधुमेह व हृदयविकार रिव्हर्सल वर्कशॉप” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम येत्या रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत लोकमान्य टिळक वाचनालयातील बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पार पडणार आहे.
या कार्यशाळेमध्ये माधवबागचे रिजनल हेड (पश्चिम महाराष्ट्र व गोवा) डॉ. सचिन पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढणारे मधुमेह आणि हृदयविकार हे गंभीर पण परतवता येण्यासारखे आजार आहेत. माधवबागच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा रुग्णांना औषधांशिवाय आजार नियंत्रणाचे पर्याय, योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व शिकवेल.
या वर्कशॉपमध्ये मधुमेह आणि हृदयविकार रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांसह आरोग्य विषयात रस असलेले सर्वजण सहभागी होऊ शकतात. सहभागींसाठी प्रेरणादायी अनुभव, व्यावहारिक हेल्थ टिप्स आणि आरोग्य सल्ले दिले जाणार आहेत.
कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री अरुण इंगवले, वुमन सपोर्ट वुमन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन मदार, तसेच माधवबागचे डॉ. राधा मोरे आणि डॉ. माधव सोमण यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे “स्वास्थ्य हीच खरी संपत्ती — मधुमेह परतवण्याची हीच योग्य वेळ!” हा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: ८१७७९८२९९०
