५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचे नेत्रदीपक यश

चिपळूण : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण–सावर्डे संचलित डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने १०, ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवने उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाने उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला.

उच्च प्राथमिक गटात (इयत्ता ६ वी ते ८ वी) सुमन विद्यालय, टेरवच्या कुमारी विभावरी संतोष वास्कर (इयत्ता ८ वी) व कुमार हर्ष विजय गावडे (इयत्ता ८ वी) यांनी सादर केलेल्या “वृद्धांचा सोबती” या विज्ञान उपकरणाला चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (इयत्ता ९ वी ते १२ वी) कुमारी तन्वी प्रदीप सागवेकर (इयत्ता १० वी) व कुमार प्रथमेश मनोहर मांडके (इयत्ता ९ वी) यांनी सादर केलेल्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या उपकरणालाही प्रथम क्रमांक मिळाला.

या दोन्ही विज्ञान उपकरणांची पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभात श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण–सावर्डेचे संचालक व एस. व्ही. जे. सी. टी. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष श्री. विकास वालावलकर आणि पंचायत समिती चिपळूणचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. इरनाक साहेब यांच्या शुभहस्ते सुमन विद्यालय, टेरवचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राज अहमद देसाई, श्रीमती अस्मा कौसर देसाई, श्रीमती सशाली मोहिते, माननीय डॉ. डोनाल, केंद्रप्रमुख श्रीमती गावडे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश सुर्वे, गणित मंडळाचे अध्यक्ष श्री. बिराप्पा मोटगी, श्री. आशुतोष गांधी, परीक्षण समिती प्रमुख श्री. राजेश इंगळे, श्री. सय्यद, श्री. शेले यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, तालुका विज्ञान–गणित मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक व बालवैज्ञानिक उपस्थित होते.

या यशासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. अमोल टाकळे तसेच मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विकास कदम, सचिव श्री. योगेश कदम, खजिनदार श्री. अजित कदम तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख