श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी राजन खेडेकर
- by Yogesh Bandagale
- January 12, 2026
- 56 views
चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवड सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते श्री. राजन रमाकांत खेडेकर यांची संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या वेळी संचालक मंडळातील श्री. कुंदन खातू, श्री. मल्लेश लकेश्री, श्री. सिद्धेश लाड, श्री. विनोद फणसे, श्री. शाळीग्राम विखारे, श्री. सुहास चव्हाण, सौ. शिल्पा जागुष्टे, श्री. विलास चिपळूणकर आदी संचालक उपस्थित होते.
श्री. राजन रमाकांत खेडेकर हे गेल्या 20 वर्षांपासून श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत असून त्यांनी यापूर्वी विश्वस्त आणि उपकार्याध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेचे संघटक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर, माजी अध्यक्ष श्री. उदयशेठ गांधी, उपाध्यक्ष श्री. अशोक मेहेंदळे, श्री. उल्हास पवार, सौ. सई वरवाटकर, विश्वस्त श्री. वसंतशेठ उदेग, डॉ. यतीन जाधव यांच्यासह वैश्यनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. हेमंतशेठ शिरगावकर, शिवसेना तालुका संघटक व माजी नगरसेवक श्री. राजू देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. सचिन उर्फ भैय्या कदम, युवासेना शहरप्रमुख श्री. पार्थ जागुष्टे, वैश्य युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. श्रीनाथ खेडेकर, उद्योजक श्री. प्रथमेश कापडी, श्री. विजय गांधी, श्री. काणेकर, श्री. कमलाकर, श्री. शुभम देवळेकर, सौ. समृद्धी देवळेकर, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. भाऊ कांबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
