मंगेश घाग यांची तलाठी संघटनेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 95 views
सावर्डे | प्रतिनिधी : संदीप घाग
नायशी (घागवाडी) येथील सुपुत्र तथा विद्यमान माबळे येथील तलाठी मंगेश घाग यांची रत्नागिरी–सिंधुदुर्ग तलाठी संघटनेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्यासह नायशी पंचक्रोशी परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी–सिंधुदुर्ग तलाठी संघटना, तालुका संगमेश्वर यांची सन २०२६ सालासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी मंगेश घाग यांची बिनविरोध वर्णी लागली.
नवीन कार्यकारिणीत
-
उपाध्यक्ष : सौ. दीपाली तांबे
-
सचिव : महेश माने
-
सहसचिव : सौ. प्रज्ञा काईगडे
-
खजिनदार : सोहन वीर
-
सहखजिनदार : शितल कदम
यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सल्लागारपदी ए. जी. जाधव भाऊसाहेब आणि सागर करंबेळे भाऊसाहेब यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून ए. ए. चाळके भाऊसाहेब तर सह-अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त अधिकाऱ्यांनी काम पाहिले.
मंगेश घाग हे निवृत्त माजी सैनिक विधमान माबळे यांचे सुपुत्र असून त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची भावना तलाठी बांधवांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
