वाशिष्ठी डेअरीतर्फे १३ हजारांहून अधिक दूध उत्पादकांना ₹७८ लाखांचा बोनस जाहीर
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 88 views
चिपळूण (प्रतिनिधी) : केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या अग्रगण्य दुग्धप्रकल्पाने यंदाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची गोड भेट दिली आहे.
या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल ₹७८ लाख ५६ हजार ४४१ रुपयांचा दिवाळी बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचा पाया : सुभाषराव चव्हाण यांची संकल्पना
कोकणातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतूनच चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन प्रशांत यादव यांनी ही जबाबदारी सांभाळत प्रकल्पाला केवळ काही वर्षांतच महाराष्ट्रात वेगळी ओळख मिळवून दिली.
संख्येत व विश्वासात मोठी वाढ
गतवर्षी 2023-24 मध्ये 7,542 शेतकऱ्यांना ₹४८ लाख ६५ हजार ७५४ रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला होता.
तर यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढून १३,५४६ इतकी झाली असून बोनस रक्कमही जवळपास दुपटीने वाढवण्यात आली आहे.
हा उपक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमांचा सन्मान आणि त्यांच्या विश्वासाला दिलेले प्रत्यक्ष उत्तर असल्याची भावना शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
चेअरमन प्रशांत यादव यांचे म्हणणे
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव म्हणाले —
“शेतकऱ्यांचे श्रम, प्रामाणिकता आणि गुणवत्तापूर्ण दूधपुरवठा हेच वाशिष्ठी डेअरीचे खरे सामर्थ्य आहे. हा दिवाळी बोनस म्हणजे त्यांच्या कष्टाची पोचपावती असून, त्यांच्या घराघरात आनंदाचा गोडवा पोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
शेतकऱ्यांचा समाधानाचा सूर
या निर्णयाचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत करत म्हटले की —
“वाशिष्ठी डेअरीने सदैव शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. नियमित देयके, पारदर्शक व्यवहार आणि प्रामाणिक कारभार यामुळे शेतकऱ्यांचा डेअरीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
