मतदारसंख्या नव्हे, तर गरज महत्त्वाची : आमदार शेखरजी निकम
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 93 views
चिपळूण : चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये दादर येथे विहीर बांधकाम (₹१५ लाख), गणपती विसर्जन घाट बांधकाम (₹१० लाख), अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण (₹२५ लाख) तसेच महिला प्रभाग संघासाठी इमारत बांधकाम (₹२५ लाख) अशा विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशोकभाई कदम यांनी दादर गाव छोटे असले तरी येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, पाच-सहा वर्षांपूर्वी दसपटी भागात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्या वेळी आमदार शेखरजी निकम यांच्या विशेष प्रयत्नांतून महत्त्वाचे पूल बांधण्यात आले. तसेच ओवाळी, नांदिवसे, रिकटोली व तिवरे या भागांतील धरणांची कामेही उत्तम दर्जाची सुरू असून, यापूर्वी या भागात असा विकास कोणीही केला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या बचत गट इमारतीबाबत बचत गटाच्या अध्यक्षा यांनी आमदार निकम यांचे मनापासून कौतुक केले. यावेळी अमित कदम यांनी सांगितले की, दादर गावाला जेव्हा जेव्हा कोणत्याही विकासकामांची गरज भासली, तेव्हा आमदारांनी ती तातडीने पूर्ण केली.
कार्यक्रमात आमदार शेखरजी निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दसपटीप्रमाणेच दादर गावाचाही विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. गावाची मतदारसंख्या महत्त्वाची नसून नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य आहे. “मतदान किती झाले याकडे न पाहता मी जनतेचा सेवक म्हणून काम करत असून, भविष्यातही अशाच प्रकारे विकासासाठी प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार शेखरजी निकम, अशोकभाई कदम, अमित कदम, पांडूशेठ माळी, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे, कविता आंबेडे, प्रकाश शिंदे, प्रदीप शिंदे, अनंत सकपाळ, प्रकाश पवार, सविता निकम, मानसीक कदम, सूरज पवार, प्रवीण पवार, वैशाली नलावडे, सुरेखा गमरे, जान्हवी सकपाळ, जागृती पवार, जगन्नाथ सकपाळ, विलास सकपाळ, जयश्री सकपाळ, संदीप पवार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
