भाजपाच्या सेवा पंधरवडानिमित्त चिपळुणात स्वच्छता मोहीम
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 162 views
चिपळूण: भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलाच्या वतीने सेवा पंधरवडा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण बसस्थानक येथे स्वच्छता मोहीम पार पडली.
मध्यवर्ती व जुना बसस्थानक याठिकाणी सकाळी ८ ते १०.३० वाजता गवत काढणे, प्लास्टिक बॉटल व रॅपर साफ करणे, तसेच अन्य कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत प्रवासी वर्गही सहभागी झाला.
भाजपा शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरात "पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं" अशा घोषणांनी वातावरण उत्साही झाले.
या मोहीमेत भाजप नेते प्रशांत यादव, रामदास राणे, विजय चितळे, आशिष खातू, नरेंद्र बेलवलकर, सारिका भावे, विनायक वरवडेकर, शीतल रानडे, रत्नदीप देवळेकर, रसिका देवळेकर, संदीप भिसे, वैशाली निमकर, अश्विनी वरवडेकर आदी उपस्थित होते.
