जितेंद्र उर्फ पप्प्या चव्हाण व वसंत उदेग यांचा शिवसेनेत प्रवेश
- by Yogesh Bandagale
- January 06, 2026
- 846 views
चिपळूण: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र उर्फ पप्प्या चव्हाण हे उद्या बुधवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
हा पक्षप्रवेश सोहळा आज सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील यशस्वी उद्योजक व कुणबी समाजाचे नेते वसंत उदेग हेही कळवंडे येथील जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात दुपारी बारा वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला माजी आमदार सदानंद चव्हाण, अण्णा कदम, युवा नेते विपुल कदम, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, तालुकाप्रमुख रुपेश घाट आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
