प्रकाश महाजन अखेर शिंदे गटात


मुंबई : मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.

प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ते कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. आज अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करून या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, मी प्रकाश महाजन यांचे मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. त्यांनी शिवसेना व माझ्यावर विश्वास ठेवून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.

प्रकाश महाजन मुळातले शिवसैनिक

मी अगदी जवळून प्रकाश महाजन यांची कार्यपद्धती पाहिली. ते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले मुळातले शिवसैनिक आहेत. त्यांना जी जबाबदारी मिळाली, त्यांनी ती अतिशय जबाबदारीने व सकारात्मकतेने पार पाडली. सर्वसामान्य माणसांचे काम व अडचणी आपण सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणूनच सोडवता येतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्याकडे अनेक पदे होती. पण त्यांनी कधीही पदाचा मोठेपणा दाखवला नाही. ते उत्कृष्ट वक्ते व प्रवक्ते आहेत. मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी त्यांना ऐकले.

संबंधित लेख