देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 21 Views
पुणे : इंडिगो एअरलाईन्सच्या ऑपरेशनल अडचणींमुळे देशभरातील विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अचानक उड्डाणे रद्द केल्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून, परिस्थिती अक्षरशः बसस्टँडची आठवण करून देणारी बनली आहे. इंडिगोने पत्रक जारी करून प्रवाशांची माफी मागितली असली, तरी प्रवाशांच्या मनस्तापात कोणतीही कमी आलेली नाही.
इंडिगोच्या सेवेत अचानक आलेल्या खंडामुळे इतर विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर प्रचंड वाढवले आहेत.
✈️ पुणे → मुंबई : ₹61,000
✈️ पुणे → दिल्ली : ₹27,000
✈️ पुणे → बंगळुरू : ₹49,000
सामान्य प्रवाशांना परवडणार नाहीत अशा या दरांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई–लंडन प्रिमियम इकॉनॉमीचे तिकिट जे 50–70 हजारांत मिळते किंवा मुंबई–थायलंड प्रवासाचे तिकिट जे 15–30 हजारांत मिळते, त्यापेक्षा पुणे–मुंबई या अवघ्या 25 मिनिटांच्या हवाई प्रवासाचे तिकीट चक्क 61 हजारांवर पोहोचल्याने जनतेत नाराजी वाढली आहे.
सलग चौथ्या दिवशी ऑपरेशन समस्यांशी तडजोड करताना इंडिगोला मोठा फटका बसत आहे.
• आज देशभरातील 600 हून अधिक उड्डाणे रद्द
• दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत एकही इंडिगोचे विमान उड्डाण नाही
उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे इतर कंपन्यांच्या तिकीट दरात चौपट वाढ झाली आहे, आणि प्रवाशांच्या अडचणी विकोपाला पोहोचल्या आहेत.
इंडिगोने एक निवेदन जारी करत म्हटले आहे :
“दिल्लीहून 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे आमच्या मौल्यवान प्रवाशांना आणि भागधारकांना झालेल्या गंभीर गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो.”
तथापि, अचानक रद्द झालेली उड्डाणे, वाढलेले तिकीट दर आणि अडकलेले प्रवासी — या सगळ्यामुळे देशभरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
