श्री देव मार्लेश्वर परिसरात उद्या स्वच्छता अभियान
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 40 views
देवरूख: तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मार्लेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर देवस्थान आणि देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक ३ रोजी सकाळी ९ वाजता श्री मार्लेश्वर परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
श्री मार्लेश्वर यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे कड्याकपारीतील संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राहावा, या उद्देशाने “स्वच्छ मार्लेश्वर – सुंदर मार्लेश्वर” हा नारा देत हे अभियान राबविले जाणार आहे.
आपले श्रद्धास्थान स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून या उपक्रमात सर्व भाविक, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
