डॉ. उदय औताडे यांच्याकडून आरती फाऊंडेशनला भरीव आर्थिक मदत
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 44 views
चिपळूण : समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणारे डॉ. उदय औताडे यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत आरती फाऊंडेशनला भरीव आर्थिक मदत दिली आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे फाऊंडेशनच्या उपक्रमांना बळ मिळणार असून, सामाजिक कार्याच्या विस्तारास हातभार लागणार आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच त्यांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने कोणताही कौटुंबिक सोहळा न करता, त्या खर्चाच्या रकमेचा उपयोग त्यांनी आरती फाऊंडेशनसाठी केला. ही मदत त्यांनी समाजहितासाठी अर्पण करत आपली समाजप्रेमी वृत्ती अधोरेखित केली आहे.
डॉ. औताडे यांचे योगदान केवळ आरती फाऊंडेशनपुरते मर्यादित नसून, त्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गरजूंसाठी मदत, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम आदी क्षेत्रांत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. औताडे यांच्या या दानशूरतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, व्यक्तिगत सोहळ्यांवर खर्च करण्याऐवजी सामाजिक संस्थांना मदत करणे ही त्यांची भूमिका समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्यातून समाजातील इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
