डी.बी.जे. कॉलेज चिपळूणमध्ये केम-फेस्ट २०२५ ‘ऑरबिट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 38 views
रसायनशास्त्र विभागाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथील रसायनशास्त्र विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केम-फेस्ट २०२५ ‘ऑरबिट’ या महाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत करणे तसेच रसायनशास्त्र विषयाबद्दल गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या केम-फेस्ट अंतर्गत केम-पोस्टर, केम-रांगोळी, केम-प्रोजेक्ट व केम-शब्दकोडे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १४१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन न. ए. सोसायटीचे चेअरमन मा. श्री. मंगेश तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी डी.बी.जे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, डॉ. सी. सी. आठवले व सौ. स्नेहल कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धांचे परीक्षण डॉ. एस. एस. खोत, डॉ. एन. एस. शिंदे, डॉ. एस. एच. माने, डॉ. एच. टी. बाबर, प्रा. एस. एम. माने, प्रा. अरुण जाधव, प्रा. सोनाली खर्चे व प्रा. व्ही. पी. जाधव यांनी केले.
स्पर्धांचे निकाल
केम-पोस्टर स्पर्धा :
कनिष्ठ महाविद्यालय – कु. वैष्णवी माटे व कु. सन्वी अदावडे (प्रथम), कु. दीक्षा झोरे व कु. श्रेयशा नरळे (द्वितीय), कु. रिधिमा रामटेके व कु. वैष्णवी तटकरे (तृतीय)
वरिष्ठ महाविद्यालय – कु. संकेत राणे व यश सावर्डेकर (प्रथम), कु. अश्विनी ठोंबरे (द्वितीय), कु. रुणाली कांबळी व कु. कल्याणी आदावडे (तृतीय)
केम-रांगोळी स्पर्धा :
कनिष्ठ महाविद्यालय – कु. इरा सावंत व कु. सई शिंदे (प्रथम), कु. वैभवी महाडिक व कु. श्रावणी साळुंखे (द्वितीय), कु. तन्वी कदम व कु. विधी मोहिते (तृतीय)
वरिष्ठ महाविद्यालय – कु. सुदेश सुतार व कु. यश सावर्डेकर (प्रथम), कु. भूमी जुवळे व सानिका पवार (द्वितीय), कु. स्वरांगी म्हैसकर (तृतीय)
केम-प्रोजेक्ट स्पर्धा :
कनिष्ठ महाविद्यालय – कु. जवाद अश्रफ चौगुले व कु. अमन बिजले (प्रथम), कु. रिदिमा रामटेके व कु. वैष्णवी तटकरे (द्वितीय), कु. दिव्या राठोड व कु. राणी शर्मा (तृतीय)
वरिष्ठ महाविद्यालय – कु. साईराज धाडवे (प्रथम), कु. ओमकार टकले (द्वितीय), कु. फरीहा तांबे व कु. मिसबा भरवेलकर (तृतीय)
केम-क्रॉसवर्ड स्पर्धा :
कनिष्ठ महाविद्यालय – कु. रिदिमा रामटेके (प्रथम), कु. तनिषा भुरण (द्वितीय), कु. अनिल केंद्रे (तृतीय)
वरिष्ठ महाविद्यालय – कु. कुणाल सोलकर (प्रथम), कु. साहिल सुर्वे (द्वितीय), कु. मधुरा रेळेकर (तृतीय)
याशिवाय कामथे येथील बाळासाहेब माटे विद्यालय, सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यमिक विद्यालय, माध्यमिक महिला विद्यालय पाग व इंग्लिश मिडियम स्कूल पाग येथील एकूण २१७ विद्यार्थ्यांनी या केम-फेस्टला भेट देत विज्ञानविषयक उपक्रमांचा अनुभव घेतला.
पारितोषिक वितरण समारंभ न. ए. सोसायटी, चिपळूणचे सचिव श्री. अतुल शेठ चितळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख श्री. एस. के. जाधव, श्री. एम. टी. दलवाई, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. एस. एस. खोत व श्री. ए. वाय. पुनवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
