‘नवरात्रौत्सव-रिल्स स्पर्धा २०२५’; ओंकार मित्र मंडळाचा उपक्रम, तरुण उद्योजकांचा पुढाकार

चिपळूण : ओंकार मित्र मंडळ, काविळतळी यांनी यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा आणि आधुनिक उपक्रम हाती घेतला आहे. तरुण उद्योजक व हॉटेल “ग्यामा” चे संचालक गौरव गांधी, अमित महाडीक व कौशल गांधी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली ‘नवरात्रौत्सव-रिल्स स्पर्धा २०२५’ ही स्पर्धा पारंपरिक उत्सव आणि डिजिटल माध्यमांचा सुंदर संगम साधणारी ठरणार आहे.

 

या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक उत्सवांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून तरुणाईला क्रिएटिव्हिटी दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. तरुण पिढी आपल्या भावना, विचार आणि कलागुण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असल्याचे लक्षात घेऊन ही स्पर्धा राबविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना मंडळाच्या विविध कार्यक्रमांवर, देवीच्या आगमन सोहळ्यावर व नवरात्रीच्या उत्साहावर आधारित रिल्स तयार कराव्या लागतील.

 

“आजच्या युगात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड आहे. आपल्या पारंपरिक उत्सवांना डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. चिपळूणमधील कलावंत व दांडिया प्रेमी या उपक्रमाला निश्चितच प्रतिसाद देतील आणि त्यांच्या कलेला योग्य प्रसिद्धी मिळेल,” असे मत गौरव गांधी यांनी व्यक्त केले.

 

‘नवरात्रौत्सव-रिल्स स्पर्धा २०२५’ ही सर्वांसाठी खुली असून व्यावसायिकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेचा कालावधी २२ सप्टेंबर २०२५ ते ०१ ऑक्टोबर २०२५ असा असेल. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार असल्याने स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

या उपक्रमामुळे चिपळूणच्या सांस्कृतिक जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला असून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अक्षय केदारी (९५६१११७६७४) किंवा सचिन पालशेतकर (९९२१८७७३९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

दरम्यान, या स्पर्धेचे पोस्टर अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी तरुण व्यावसायिक गौरव गांधी, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, माजी अध्यक्ष संजय चिपळूणकर, सल्लागार अविनाश केळसकर, प्रकाश देसाई, संदीप चिपळूणकर, भैया कदम, विजय उतेकर, उपाध्यक्ष सशी पवार, सचिव संतोष नारळकर, सहसचिव अक्षय केदारी, खजिनदार राजेश चिपळूणकर, सदस्य हनुमंत केदारी, प्रणव सुर्वे, सचिन पालशेतकर, सुधीर चव्हाण, मनोहर खेडेकर, मोहम्मद रियाने, सातपुते व अक्षय कमळाकर उपस्थि

त होते.

संबंधित लेख