जिजाऊ ब्रिगेडतर्फे दशरात्रोत्सवांतर्गत भव्य वेशभूषा स्पर्धा

चिपळूण :  सावित्रीबाई फुले जयंती (दि. ३) ते राजमाता जिजाऊ जयंती (दि. १२ जानेवारी) या कालावधीत रत्नागिरी जिल्हा, चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे दशरात्रोत्सव साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून लहान गट, मोठा गट आणि खुला गट असे तीन गट ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे खुल्या गटात महिलांचाही सहभाग लक्षणीय ठरला. ऐतिहासिक महानायिकांचे कार्य आणि त्यांची कीर्ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच मुलांमध्ये जनजागृती घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सईबाई, ताराराणी, येसूबाई, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, माता रमाई आदींच्या वेशभूषा साकारण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. अपूर्वा गायकवाड यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेने वातावरण शिवमय झाले. यानंतर मान्यवरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष अनुजाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुणी, माजी नगराध्यक्ष रेहान बिजले, WSWच्या अध्यक्ष व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार, महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव, कालूस्तेचे माजी सरपंच डॉ. रेहमत जबले, यश अकॅडमीच्या प्राचार्य राधा महाडदळकर आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून लायनेसच्या माजी अध्यक्ष सुप्रिया गुरव व माया गुहागरकर यांनी काम पाहिले. सर्व मान्यवरांचे स्वागत सदाफुलीचे रोप व शाल देऊन करण्यात आले.

निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट – प्रथम: जॉयस सुनील कारंडे, द्वितीय: तिर्था विनायक पडवळ, तृतीय: मनवा प्रशांत सातारकर; उत्तेजनार्थ: अनन्या सुचिंद पालांडे, मानवी मनोहर धुमाळ.
मोठा गट – प्रथम: सिद्धी संजय उजगावकर, द्वितीय: अनुष्का संदीप घाग, तृतीय: उमिका विनायक बेंदरकर; उत्तेजनार्थ: दिया संदेश लिंगायत, अनुजा अवधूत मगदूम.
खुला गट – प्रथम: मेधा सावर्डेकर, द्वितीय: रेवती बेंदरकर, तृतीय: वैष्णवी रेडीज.

विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली, तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्रे जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट व भेटवस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका राणी महाडिक, नगरसेविका उमा देसाई, नसरीन खडस यांच्यासह अर्चना कदम, पूनम भोजने, मनाली जाधव, तृप्ती कदम, जिल्हा सल्लागार ॲड. वृषाली सावंत तसेच सामाजिक क्षेत्रातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अनुजाताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विभावरी जाधव, कोशाध्यक्ष शिवानी भोसले, सचिव पूर्वा तांदळे, तालुका संघटक सुकन्या चव्हाण, शहर उपाध्यक्ष अपूर्वा गायकवाड, खेड तालुकाध्यक्ष रोहिणी मोरे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष मिताली कडवाईकर, जया मोरे, नेहा जाधव आदींनी केले. सूत्रसंचालन रसिका परब यांनी केले तर आभार प्रदर्शन अपूर्वा गायकवाड यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संबंधित लेख