उमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांचा शिंदे गटात प्रवेश
चिपळूण :
आगामी चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. रविवारी चिपळूण शहरातील विविध भागांतील अनेक तरुणांनी शिंदे गट शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात पेठमाप येथील अमान कासकर, हसन कासकर, गुहागर नाका येथील साद नवसेकर, हमदान रुमानी, गोवळकोट रोड येथील अर्श तांबे, तसेच मुरादपूर येथील रणजीत मोहन कदम व रुचिता रणजीत कदम आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.

या सर्व नवागतांचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास महिला आघाडी, युवासेना, सर्व उपशहरप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरात या प्रवेशामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) ताकदीत वाढ झाल्याचे मानले जात असून, आगामी निवडणुकीत तरुण मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

संबंधित लेख