चिपळूणचे डॉ. पार्थ मेहता आता एम.एस. ऑर्थोपेडिक पदवीधर
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 1544 views
चिपळूण | प्रतिनिधी
चिपळूण येथील सुप्रसिद्ध उद्योजक मिलिंद मेहता व अनिता मेहता (पेट्रोल पंप मालक, जी. बी. मेहता – चिपळूण शाखा) यांचे सुपुत्र डॉ. पार्थ मेहता यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ. पार्थ मेहता यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी कॉलेज येथून मास्टर ऑफ सर्जरी (ऑर्थोपेडिक्स – MS Orthopedic) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी कराड येथील कृष्णा कॉलेज येथून एम.बी.बी.एस. पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० च्या कोविड-१९ महामारीच्या काळात डॉ. पार्थ मेहता यांनी सलग दोन वर्षे चिपळूण नगरपालिकेच्या रुग्णालयात सेवा बजावत हजारो रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावासाठी त्यांना ‘कोविड योद्धा’ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
सध्या डॉ. पार्थ मेहता हे रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल) येथे सिनिअर डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
या शैक्षणिक व सेवाभावी यशाबद्दल डॉ. पार्थ मेहता यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
