कलाकार घडविण्याची दूरदृष्टी निकम साहेबांकडे होती: आम. शेखर निकम
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 41 views
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेच्या ३२ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाची स्थापना करताना शिक्षण महर्षी स्व. गोविंदजी निकम साहेबांकडे मोठी दूरदृष्टी होती. कोकणातील ग्रामीण भागातील कलाकारांना कला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले आहे. येथे शिक्षण घेऊन अनेक कलाकार आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून, याचे श्रेय ज्येष्ठ चित्रकार–शिल्पकार प्रकाश राजेशिर्के व येथील प्राध्यापकवर्गाला जाते, असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी केले.
कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कला महाविद्यालय असलेल्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या ३२ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान आमदार शेखर गोविंदराव निकम (चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ) यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जयंत कदम (चित्रकार, सातारा), रोहन पवार (शिल्पकार, मुंबई), प्रकाश अर्जुन राजेशिर्के (चेअरमन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे), सौ. पूजा निकम (माजी सभापती), सौ. युगंधरा राजेशिर्के, अनिरुद्ध निकम, बत्तासे सर, भोसले सर, लकेश्री सर, वाघचौरे सर, चित्रकार विष्णू परीट, भुरण मॅडम, सावर्डेकर सर, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, प्रा. धनंजय दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेखर निकम पुढे म्हणाले की, कला क्षेत्रात सातत्याने नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा सामना करण्यासाठी सर्व कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कलाकार जेव्हा आपल्या कलाकृतीत सर्वस्व पणाला लावतो, तेव्हाच ती कलाकृती बोलकी होते.
प्रारंभी प्राचार्य माणिक यादव यांनी प्रास्ताविकात कला महाविद्यालयाच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कला प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी दिला जाणारा शिक्षण महर्षी स्व. गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार यंदा प्रसाद सत्यवान राणे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राणे हे अनुभवी कला शिक्षक असून त्यांनी एस.एस.सी., ए.टी.डी., जी.डी. आर्ट व ए.एम. असे कला शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे सहाय्यक कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कला क्षेत्रातील त्यांचे योगदान व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रसाद राणे म्हणाले की, कोकणातील भव्य अशा कला महाविद्यालयाकडून सन्मान मिळणे हे माझे भाग्य आहे. आज कला शिक्षक काहीसे दुर्लक्षित होत असले तरी कला व क्रीडा शिक्षक हे शाळेचा आरसा असतात. शासनाने या दोन्ही शिक्षकांना सन्मानाने नियुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वार्षिक कला प्रदर्शनाचे परीक्षक शिल्पकार रोहन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी ए.आय.सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा; मात्र स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करून आपली वेगळी ओळख निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यशासाठी सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची असून कलाकारांनी आपला हात सतत कामात गुंतवून ठेवावा, असे त्यांनी नमूद केले.
कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार–शिल्पकार प्रकाश राजेशिर्के म्हणाले की, निकम साहेबांनी अत्यंत दूरदृष्टीने या कला महाविद्यालयाची स्थापना केली. आजवर येथे घडलेले आणि यशस्वी झालेले कलाकारांनी आपल्या मातृसंस्थेला कधीही विसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या वार्षिक कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या चित्रकला, शिल्पकला, रेखांकन, रंगकाम, प्रतिमानबंध आदी विविध माध्यमांतील कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीपकुमार देडगे यांनी केले.