आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा; विद्यार्थ्यांनी साकारल्या विविध वेशभूषा
- by Yogesh Bandagale
- December 31, 2025
- 192 views
चिपळूण: आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६ च्या निमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि सिमिलॅरिटी ड्रेस स्पर्धा यांचे आयोजन दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती दौंडे, सौ. जाधव, सौ. पडवेकर व सौ. पवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माळी यांनी भूषविले, तसेच कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ. माळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी महान संत, देव-देवता आणि विविध थोर पुरुषांच्या भूमिका साकारल्या. याशिवाय पर्यावरण संवर्धन संदेश देण्यासाठी वासुदेवाच्या भूमिकेतून “झाडे लावा” हा संदेश दिला गेला, तर शहामृगाच्या भूमिकेतून पक्षी संवर्धनाची माहिती विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली.
इयत्ता पाचवी ते आठवी गटातील विद्यार्थिनी कुमारी कृतिका विजय घोरपडे (सातवी) याला विज्ञान लावणी या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक मिळाले. मोठ्या गटांमध्ये इयत्ता दहावी अ च्या मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.
शालेय सूत्रांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा उत्साह, कलात्मक सादरीकरण आणि सामाजिक-सांस्कृतिक संदेश देण्याची क्षमता पाहून कार्यक्रम यशस्वी ठरला.
