आकले (जुनावडे) येथील हनुमान मंदिराचे उदघाटन उत्साहात संपन्न
- by Yogesh Bandagale
- December 08, 2025
- 60 views
पिंपळी (चिपळूण) : आकले (जुनावडे) येथील जय हनुमान मंदिराचे उदघाटन शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशिष्ठी डेअरीचे चेअरमन व भाजप नेते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
यादव यांनी मनोगतात सांगितले की, वाडीतील ग्रामस्थांची एकी, चिकाटी आणि भक्तीभावामुळे हे दिमाखदार मंदिर उभे राहू शकले. मंदिर उभारणीसाठी मदत करणाऱ्या देणगीदार आणि जमीन मालकांचे त्यांनी आभार मानले. तसेच उपस्थितांना मारूती स्तोत्रांचा अर्थ समजावून सांगत हनुमान भक्तीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.
उदघाटन कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. जि.प.चे माजी सभापती विनोद झगडे, गावचे अध्यक्ष अनंत कदम, पुणे मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, तसेच सुरेश शिगवण, रामचंद्र मनवल, रामचंद्र शिगवण, संदीप मनवल, संतोष शिंदे, रविंद्र कदम, मंगेश कदम, संजय कदम, अशोक शिगवण, ह.भ.प. आत्माराम महाराज निगडे, जनार्दन पवार, डॉ. सुनील सावंत, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पवार, सुभाष पवार, सुनील सुर्वे आदींची उपस्थिती होती.
मुंबई व पुण्यातील ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
