आनंदराव पवार महाविद्यालयाला चिपळूण हाफ मॅरेथॉनमध्ये सुयश
- by Yogesh Bandagale
- December 02, 2025
- 98 views
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित ‘चिपळूण हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. खुल्या गटातील ५ किमी धावण्यात कु. स्वराज संदीप जोशी याने प्रथम क्रमांक, कु. यश मंगेश शिर्के याने तृतीय क्रमांक, कु. ओंकार अनंत चांदिवडे याने चतुर्थ क्रमांक तर कु. राज राजेश तांबे याने पाचवा क्रमांक पटकावत महाविद्यालयाचा गौरव वाढविला. १७ वर्षे शालेय गटातील ५ किमी मुलगे विभागात कु. रुषप रविंद्र चव्हाण याने पाचवा क्रमांक मिळवला, तर मुलींच्या गटात कु. वेदिका विष्णू हरवडे हिने तृतीय क्रमांक मिळवत उत्तम कामगिरी केली. या स्पर्धकांना प्रा. सुधीर हुमने, प्रा. रुपेश भालेकर आणि प्रा. विक्रांत निवाते यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. विजेत्यांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्हे आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयशेठ गांधी, कार्याध्यक्षा सई वरवाटकर, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी व महाविद्यालयाचे चेअरमन मल्लेश लकेश्री, पीआरओ योगेश चोगले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, प्राचार्या अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
