सावर्डे विद्यालयात रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न
- by Yogesh Bandagale
- December 15, 2025
- 88 views
सावर्डे : वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत निसर्गचित्र, मुलगी वाचवा, सामाजिक जनजागृती, पाणी वाचवा–झाडे वाचवा, नशा मुक्ती, प्रदूषण, स्वच्छता, मतदान तसेच संस्कार भारती अशा विविध विषयांवर आधारित रांगोळ्या साकारण्यात आल्या. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून एकूण ४३ रांगोळ्यांच्या माध्यमातून १४२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
माध्यमिक गटाचे निकाल :
नशा मुक्ती विषयावर आधारित प्रियंका पवार (दहावी ‘क’) गटाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रदूषण विषयावर आधारित निधी भडवळकर व कस्तुरी शिंदे (दहावी ‘ब’) गटाने द्वितीय, तर स्वच्छता विषयावर आधारित दिव्या बागवे (दहावी ‘ब’) गटाने तृतीय क्रमांक मिळविला. मतदान विषयावर आधारित नववीच्या सानवी कदम गटाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
उच्च माध्यमिक गटाचे निकाल :
नशा मुक्ती विषयावर आधारित कस्तुरी दळवी (सीईटी गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मतदान विषयावर आधारित संस्कृती घडशी (कॉमर्स गट) यांनी द्वितीय, तर प्रदूषण विषयावर आधारित मीनल मांडवकर (सायन्स ‘ब’ व ‘क’ गट) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. रणवीर देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्रदान करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिसरातील अनेक पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत सुर्वे व मारुतराव घाग यांच्या हस्ते झाले, तर स्पर्धेचे परीक्षण चित्रकार दिलीप डंबे यांनी केले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यतत्पर आमदार श्री. शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन श्री. शांताराम खानविलकर,संस्थेचे सचिव श्री. महेशजी महाडिक, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पूजाताई निकम शांताराम खानविलकर व मान्यवर
