शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह (Shivsena Symbol) वादाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. बुधवारी महत्त्वाचा निकाल येईल, अशी चर्चा रंगली होती; मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांच्या अन्य प्रकरणामुळे खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलली.

आजही थाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला निश्चित केली आहे.

सुनावणीपूर्वी न्यायालयाने दोन्ही गटांना युक्तिवाद थोडक्यात मांडण्यास सांगितले होते. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या लवकर सुनावणी करण्यासाठी आग्रह धरला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ते ४५ मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करू शकतात, आणि येत्या जानेवारीत महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निकाल आवश्यक आहे.

शिंदे गटाकडे सध्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह असल्याने त्यांनी सुनावणी डिसेंबर महिन्यातही होऊ शकते, असे सांगितले. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून १२ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली.

या खटल्याच्या तारखेपासून यशस्वी निकाल मिळण्याची सर्व पक्षांना अपेक्षा आहे.

संबंधित लेख