राज्याचा अर्थसंकल्प सादर; ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 29 views
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची महत्त्वाची घोषणा करण्यात आली. तसेच सर्वांचे लक्ष लागलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच या योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Devendra Fadnavis म्हणाले की, येत्या ८ मार्चच्या International Women's Day निमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अशीच सुरू राहणार असून या योजनेसाठी आवश्यक ती मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
योजनेच्या विरोधात न्यायालयात जाऊ नका
दरम्यान, विरोधकांनी लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानाला २१०० रुपये करण्याच्या आश्वासनाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर Devendra Fadnavis म्हणाले, “काळजी करू नका, तुमच्या मनातील गोष्टी आम्हीच पूर्ण करणार. मात्र या योजनेच्या विरोधात न्यायालयात जाऊ नका,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
२५ लाख बहिणींना ‘लखपती’ बनवण्याचे उद्दिष्ट
पुढे बोलताना Devendra Fadnavis यांनी सांगितले की, सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे सविस्तर विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी योग्य धोरण आणले जाईल.
तसेच Maharashtra Gramin Jeevan Unnati Abhiyan अंतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. २०२६–२७ या वर्षात आणखी २५ लाख बहिणींना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याची माहितीही त्यांनी दिली. ?
