वुमन सपोर्ट वुमन संस्थेच्या उपक्रमातून चिपळूणकर महिलांचा उत्साह; ३०० महिलांचा गरबा रंग, सिंदूर सांग सोहळा उत्साहात
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 169 views
चिपळूण : शहरातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्त्रीशक्तीला नवचैतन्य मिळावे या हेतूने “वुमन सपोर्ट वुमन” या संस्थेच्या माध्यमातून ‘सिंदूरांजली – महिला सक्षमीकरण : गरबा रंग सिंदूर सांग’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवरात्रीच्या औचित्याने प्राथमिक शिक्षक पतपेढी हॉल येथे पार पडलेल्या या सोहळ्याने चिपळूणच्या सांस्कृतिक वातावरणात उत्साहाची नवी उधळण केली.
डॉ. कांचन मदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ‘वुमन सपोर्ट वुमन’ ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक, कला, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत दर्जेदार उपक्रम राबवत असून, यापूर्वीही चिपळूणकरांनी या संस्थेच्या उपक्रमांचा प्रत्यय घेतला आहे. त्याच परंपरेचा पुढाकार घेत या वेळेस ‘ऑपरेशन सिंदूर’ला आदरांजली स्वरूपात महिला सक्षमीकरणाची ही रंगतदार मेजवानी सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात ३०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. गरबा, फ्युजन डान्स, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साही वातावरणाने सभागृह रंगून गेले. महिलांनी अतिशय उत्साहात, आनंदमय वातावरणात कार्यक्रम साजरा केला.
या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा (राष्ट्रवादी) सौ. पूजा ताई निकम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (राष्ट्रवादी) सौ. दिशा ताई दाभोळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा (भाजप) चित्रा ताई चव्हाण, निवृत्त मुख्याध्यापिका संध्या साठे जोशी, एपीआय प्रिया महामुनी, रंजीत फाउंडेशनचे अध्यक्ष रंजीत ओतरी, राष्ट्रवादी शहराध्यक्षा डॉ. रेहमत झाबले, तालुका अध्यक्षा राधा शिंदे, नृत्यमल्हार अकादमीच्या संस्थापिका सकंद्या चितळे, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा स्नेहल चव्हाण, सहेली ग्रुपच्या सीमा रानडे, नटराज डान्स अकादमीच्या गौरी हरदारे, संगीता पालकर, अदिती देशपांडे, मनाली जाधव, शेषाली चव्हाण, मीना जावकर आदी मान्यवर महिलांनी उपस्थिती लावली. सर्व मान्यवरांचा ‘वुमन सपोर्ट वुमन’ तर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये बेस्ट ट्रेडिशनल कॉस्ट्यूम – नम्रता ओसवाल, एनर्जेटिक डान्स – गीतांजली, बेस्ट बिहेव्हिअर – टीना जैन, बेस्ट गरबा – वृषाली चांदवले, बेस्ट फ्यूजन गरबा – दीप्ती सूरवे, अर्ली बर्ड – प्रीथना लाड, बेस्ट ग्रुप – अक्षया कांबळी ग्रुप, तर विनर ग्रुप – स्टेपर्स ग्रुप* ठरले.
कार्यक्रमाची सांगता विजेत्यांना पारितोषिक वितरणाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाने चिपळूणमधील महिलांच्या कलागुणांना व स्त्रीशक्तीच्या एकजुटीला एक नवे व्यासपीठ मिळवून दिले.
