रोहिदास समाज सेवा चिपळूणतर्फे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार
- by Yogesh Bandagale
- February 01, 2026
- 114 views
चिपळूण | प्रतिनिधी: रोहिदास समाज सेवा, चिपळूण यांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून रविवारी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. माऊली संपर्क कार्यालयात हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी रोहिदास समाजाच्या समाज भवनाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे, तसेच त्या ठिकाणी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अभ्यास करून प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
रोहिदास समाज सेवा, चिपळूणचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर व अन्य समाजबांधवांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी बहुजन समाजाचा नगराध्यक्ष लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी नगराध्यक्षांकडे व्यक्त केली.
या कार्यक्रमास सर्वश्री सुरेशशेठ चिपळूणकर, देवकांत चिपळूणकर, गणेशशेठ कांबळे, समीरशेठ जानवलकर, किसनशेठ चिपळूणकर, प्रकाश पेढांबकर, सुनील चिपळूणकर, बाळकृष्ण गोवळकर, रोहितशेठ कांबळे, प्रकाश धामापूरकर, दीपक आंबोकर, रामदास सावर्डेकर, मनोहर देवरुखकर, सुभाष पेढांबकर, काशिराम पेढांबकर, विजय सावर्डेकर, दीपक भेलेकर, रमेश पेवेकर, तसेच अन्य समाजबांधव उपस्थित होते.
