अजितदादांची अस्थिकलश दर्शन यात्रा; उद्या सावर्डे येथे दर्शन
- by Yogesh Bandagale
- February 01, 2026
- 60 views
चिपळूण : लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचे आयोजन राज्यभर करण्यात आले असून, त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत,
आमदार मा. श्री. शेखर निकम यांचे जनसंपर्क कार्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
या दर्शन यात्रेमुळे नागरिकांना आदरणीय अजितदादांविषयी आपली कृतज्ञता व भावना व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. तरी आदरणीय अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
